कुसुमाग्रज

भाग १

जीवन संक्षेप
कुसुमाग्रज हे केवळ कवी नसून कवी, नाटककार, ललित निबंधकार, कथाकार म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे या सर्व प्रकारात विपुल लेखन झालेले आहे जीवनलहरी, विशाखा, किनारा, मराठी माती, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, छंदोमयी,मुक्तायन, पाथेय हे त्यांचे काव्य्संग्रह तर श्रावण हा बालगीतांचा संग्रह तसेच समिधा हा गद्यगीतांचा संगर अशी त्यांची लेखणी संग्रहित झालेली आहे.
कालिदासाच्या मेघदूताचा त्यांनी मराठी मधे केलेला अनुवाद देखील गाजलेला आहे.दुसरा पेशवा, वैजयंती, कौंतेय, राजमुकुट, आमचं नाव बापुराव, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, ययाती आणि देवयानी, मी एक मुख्यमंत्री, विदुषक, चंद्र जेथे उगवत नाही, असे अनुवादित व स्वतंत्र नाट्के देखिल आपनास माहित आहेतच!
वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर, या कादंब-या तर विराम चिन्हे, आहे आणि नाही, सतारीचे बोल, इत्यादि कथा व ललित निबंध संग्रहातून कुसुमागरजांच्या आभाळ प्रतिभेची कल्पना येते.मड्गाव येथे १९६४ साली झालेल्या भरतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष तर १९८९ साली मंबई येथील पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे देखिल ते अध्यक्ष होते.१९८९ साली ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.
“गर्जा जयजयकार” सारख्या चैतन्य आणि प्रेरणा देणा-या गीतांचे रचनाकार असणारे कुसुमाग्रज “सूर म्हणतो साथ दे” सारख्या हळव्या बालगीताला जन्म देतात तेंव्हा त्यांच्यातील अमर्याद कल्पनाशक्तीचे दर्शन होते.नाट्क, कथा, निबंध जरी गाजलेले असले तरी त्यांची मूळ वृत्ती ही कवित्वाची. निराशेचा अंधार पाजळणारे पलिते म्हण्जे त्यांच्या कविता, स्फ़ुल्लिंग! हृदयातईल आत्मविश्वासाची झेप म्हणजे कुसुमाग्रज..

“धुळीमधुनी फ़ुलतील ज्वाला
धगधगती पाषाण”

त्वेष आवेश निर्धार हे भावगून असलेल्या कवितांची भाषा नादानुकारी..त्यांच्या कवितेत रौद्र असते तशी भक्ती, तसेच कारुण्य आणि वात्सल्य पण! कोलंबसाचे गर्वगीत लिहिणा-या कुसुमाग्रजांनी सामजिकतेत शिरून हिमलाट सारखी कविता लिहावी व प्रणय गीतांत जाऊन कल्पनेपलिकडे असलेले पृथ्वीचे प्रेम गीत लिहावे ही अफ़ाट प्रतिभा..मानवाच्या जीवनात येना-या हर एक भव काव्यांत पूरण पणे उतरवला तो कुसुमाग्रजांनी!

विशाखा हा त्यांचा सर्वात लोकप्रीय संग्रह..क्रांतीचे शाहीर, साम्यवादि तत्वज्ञानाचा पाईक अशी ओळख कुसुमाग्रजांना लाभली ती या संग्रहामुळे. निसर्ग चित्रात रमवून ठेवणारी कुसुमाग्रजांची कविता एकीकडे
तर दुसरीकडे कर्तव्यनिष्ठेचे तत्वज्ञान पुढे ठेवणारी “स्व्प्नांची समाप्ती” यासारखी त्यांची कविता सर्वसाधाराण माण्साला एक पूरणेतीची अनुभुती देऊन जातात.

कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. त्यांचे वडील हे व्यवसायाने वकील होते. वाचनाचा वारसा कुसुमाग्रजांना मिलाला तो त्यांच्या वडिलांपासून व आत्यापासून. त्यांच्या वणी येथील राहणा-या आत्याचे घर म्हण्जे जणू ग्रंथालय. ईनामदारांच्या मोठ्या प्रस्तात मोठ मोठाले ग्रंथ कुसुमाग्रजांना तिथे मिळत गेले.
कुसुमाग्रजांची वाचनाला सुरवात ती राम गणेश गडकरींच्या नाटकांपासून. त्यांचे प्रेरणास्थान ठरलेत गडकरी. इतिहास वाचनाची प्रचंड आवड कुसुमाग्रजांना लहानपणापासूनच. लहान वयात त्यांनी पानिपतचा पराभव, संभाजीचा वध, नारायण रावांचा खून आदि पुस्त्के वाचलीत, वणित्च नदीपलिकडे असलेल्या एका निर्जन देवळात तास अन तास बसून कुसुमाग्रज विचार करित असत. निळा रंग. पारवा, नदी क्षितीज हे वेड त्यांना लहानपणापासून, आणि ते त्यांच्या कवितांमधे देखिल दिसून येते. तो पक्षी, निळा पक्षी, मी आणि मी , शर कुणाचा? या कवितांमधून हे भाव विषेश जाणवतात. एखाद्या दोंगरावरून घाईघाईने उतरावे व नदित मिसळून जावे असे त्यांना नेहमीच वाटत असे. त्यांच्या स्व्वभावत नदी, जंगले, पक्षी यांनी घर केलेलं..
कुसुमाग्रजांचं जन्म गाव शिरवाड… नदीची सोबत त्यांना शिरवाड्पासून लाभली..शिरवाड्ची नदी तशी लहान पण आल्हाद दायक. तीच्या खळखळत्या पाण्यात न्हाऊन घेणा-या घागरींचा लळाच जणु कुसुमाग्रजांना लागला. शिरवाड्चि ती नधी शिरवाडला, त्या प्रतिष्ठेला आणि कुसुमाग्रजांना सांभाळुन घेते असं त्यांना वाटत. पुढे कुसुमाग्रजांची गोदावरीशी गाठ पडली. या गोदावरीला नाशिक मध्ये गंगा म्हणत. शहराच्या जवळ्पास हीची तीन रुपं बघायला मिळतात. बालकविंच्या बरोबरीन घाटावर फ़िरताना बाल कुसुमाग्रजांना गदक-यांची आठवण येत असे.. पिंपळ्गावच्या चोट्या शाळेतून कुसुमाग्रज नाशिकला न्यु इंग्लीश शालेत शिकायला आलेत. तेथील वेगळे वातावरण, स्वदेशी शी प्रेम, विद्यार्थी शिक्षक यांच्यातील जिव्हाळाहा त्यांच्या कवित्वाचा आधार बनला. क्रिकेट, अभिनय यांच्याशी त्यांचे नाते जुळले ते इथेच. इथेच असताना कुसुमाग्रजाम्नी त्यांचे पहिले हस्त्लिखित काढले.
शालेय वयात नव्या सहित्याचि आवड व त्याचे वाच देखिल कुसुमाग्रजांना घडवू लागले. त्याच काळात “लोकसत्ता” मधे त्यांच्या हस्त्लिखितातील पहिली कविता प्रसिद्ध झाली, त्यांच्या कवितांना विषेश लोक्प्रीयता मिळू लागली ती महाविद्यालयात.. महाविद्यालयात असताना नाशिक मधील स्थानीय साप्ताहिकात त्यांची “नवा मनु” ही कविता प्रसिद्ध झाली आणि तीथून एक नवोदित कवी म्हणून
कुसुमाग्रजांची ओळख होऊ लागली.

सत्यशोधक मनाचा त्यांच्या मनावर पगड बसू लागला. महाविद्यालयाच्या दुस-या वर्षाला असतानाच्नाशिक मधे आंबेड्करांच्या नेतृत्वाखाली राममंदिर सत्याग्रहाचा लढा उभारण्यात आला, त्यात कुसुमाग्रजांचा ओढा हा मंदिर प्रवेषाच्या मताला अनुकुल होता.

महाविद्यालयात शिकत असतानाच काव्य ह्या प्र्काराच्या आकलनाशि कुसुमाग्रजांचं नातं जुळलं, काव्याच्या रसग्रहणाचे प्रयत्न सुरू झालेत, ह्याच काळात त्यांनी नाटकांचा देखील रितसर अभ्यास सुरू केला.नाट्कांपेक्षा त्यांन अकविता अधि जवळची वाटे. त्या काळात नावाजलेल्या इंग्रजी कवितांचा अनुवाद देखिल त्याम्नी केला परंतू तो फ़ारसा कुठे बघायला मिळाला नाही.

कुसुमाग्रजांवर बालक्वी व गोविंदाग्रजांच्या लेखणीचा प्रभाव होता..ते स्पष्ट पणे तसे सांगत. ते म्हणत, “या दोन दिग्गज्जांना नजरेसमोर ठेवूनच मी माझ्या १०० कविता लिहिलेल्या आहेत”सुरवातीच्या काळात त्यांचा काव्य वेग हा प्रचंड होता…त्यांना काही काळ भा. रा. तांबे. माधव ज्युलीयन, केशवसुत यांच्या कवितांच खूप आकर्षण होतं. त्यांच्या कविता प्रसिद्धीच्या वळनावर मात्र थोड्या कालानंतर पुढे सरकल्या. सुरवातीला अनेक सापताहिकांत छापण्यास दिलेल्या कविता त्यांना परत येऊ लागल्या…मात्र “रत्नाकर” या माहिकातून त्यांच्या दोन कविता छापून आल्यानंतर ते प्रकाश झोतात येऊ लागले.
त्नाकर नंतर प्रतिमा, संजीवनी, विहंगम, ज्योत्सना, आदि नियतकालिकातून त्यांचे प्रकाशन सुरू झाले
नाशिकला महाविद्यालयात असतानाच कुसुमाग्रज, माधव, मनोहर, ल.वा केळकर, इत्यादिंनी मिळून रविकिरण मंड्ळाच्या धरती वर एक धृवमंडळ स्थापन केले. दर रविवारी सायंकाळी कुसुमाग्रजांच्या खोलीत त्यांची सभा होत. कुसुमाग्रजांच्या सहित्य प्रवासात या खोलीची एक निश्चित जागा आहे कारण कुसुमाग्रजांचा पहिला प्रकाशित झालेला “जीवनलहरी” हा संग्रस इथेच याच खोलीत तयार झाला. जीवन लहरी निर्माण झाले ,प्रकाशित झाले त्यावेळी या. मु पाठक यांच्या शशी मोहन काव्याचा ही कुसुमाग्रजांवर विशेष परिणाम झाला. याच काळात कुसुमाग्रजांचे आवडते काव्य दैवत होते माधव ज्युलीयन.१९३३ सालि नाशिक ला माधव ज्युलीयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसम्मेलनात कुसुमाग्रजांच्या व्यक्तिमत्वाची व काव्याची तारी ज्युलीयन यांनी केली होती.
१९३५ साली बी ए झाल्यानंतर नोकरी न करण्याच्या त्यांच्या निर्नयाने त्यांना एक वेगळे क्षेत्र निवडून दिले. नाशिकच्या “गोदावरी सिनेटोन” च्या “सती सुलोचना” या चित्रपटात त्यांनी लक्षमनाची भुमिका केली. मातर पगाराचा अभाव, व कार्यातील असामाधान त्यांना छलु लागले. तीन वर्ष चित्रपट सृष्टीत असामाधानाने घालवल्या नंतर त्यांना वृत्तपत्रात प्रवेश मिळाला. पुढे त्यांना “प्रभात” ह्या वॄत्त्पत्रात नोकरी मिळाली. इथे असतान त्यांना रात्रपाळी करावी लागे. याच काळात त्यांना अनेक कविता स्फ़ुरु लागल्या. प्रभात मधे असताना लिहिलेल्य सर्व कविता त्यांनी “विशाखा” या संग्रहात घेऊन प्रकाशित केल्यात.
विशाखा नंतर १० वर्षांनी त्यांनी किनारा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. किना-यानंतर मात्र त्यांना नेहमिच यश मिळत गेले. हा काळ म्हण्जे स्वातंत्र्याच्या सुखाचा उपभोग घेऊन तृप्त होण्याचा काळ होता, आणि हीच भावना किना-या नंतर्च्या काव्यामधे आलेली दिसून येते.

कुसुमाग्रजांनी अनेक प्रकारचे काव्य लेखन केले. त्यात सामजिक, प्रेमकविता, निसर्ग कविता, तात्विक कविता, स्थळ्वर्णनात्मक कविता, व्यक्ति वर्णनात्मक कविता आदिंचा समावेश आहे. कुसुमाग्रजांच्या सामजिक कविता ह्या केशवसुतांच्या सामजिक कविताशी जवळिक असलेल्या वाटतात. त्यातल्या त्यात, केशवसुतांच्या “नवा शिपाई” ” मजुरावर उपासमारिची पाळी” यांची “कोलंबसाचे गर्वगीत”, “बली” या कुसुमाग्रजांच्या कविता वाचताना आठवण येते. सावरकरांच्या कवितेतील समर्पण, कळकळ हीकुसुमाग्रजांच्या कवितांम्दून जाणवते. कुसुमाग्रजांच्या काही कवितांचा तुलनात्मक अभ्यास करताना सावरकरांच्या आत्मबल. आकांक्षा या कविता
कुसुमाग्रजांच्या अहि-नकुल, मी जींकलो या कविताशी सार्धम्य साधणा-या वाटतात.

जवळिक किंवा आशय सार्धम्य असले तरीही कुसुमाग्रजांच्या स्वतंत्र थाट, अफ़ाट शब्द सामर्थ्य, कमालिचा कल्पनाविस्तार कुसुमाग्रजांना इतर कविंपासून वेगळे करतो

Advertisements

2 thoughts on “कुसुमाग्रज

  1. जगांत सर्वांत सुन्दर आवाज कुठला ? तर तो कारागृहातील कैद्यांच्या शृंखला खळ्खळा तुट्ण्याचा अशा आशयाची स्व. ति. तात्यासाहेबांची एक प्रसिध्द कविता आहे. क्रुपया मला मएल कराल का? – प्रसाद भागवत prasadbhagwat@vsnl.net

  2. Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav Atul Gurav

Comments are closed.