जान मचले, प्राण मचले, ए रे दरीया


विनम्र अभिवादन…… भारताच्या स्वातंत्रलढ्यातील क्रातिकारकांचे मुकुटमणी , स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर , यांचा आज आत्मार्पण दिन, अर्थातच पुण्यतिथी.

आणि म्हणूनच “ने मजसी ने” ह्या जीव हेलावून टाकणाऱ्या भावनाप्रधान गीताचा हिंदी अनुवाद केलाय.

 

ले चल मुझको, लौट मातृभूमि पर

जान मचले प्राण मचले रे दरिया……धृ

 

भारत भू के चरण हो रहे तुमको

कई बार मेने देखा है

तू मुझसे कहे, चल दूर देश हो आके,

सृष्टी की विविधता देखे,

तबही मा का दिल विरह भय से तडपा था,

पर तुमने भी वचन उसे जो दिया था,

के मार्ग मे मै खुद ही से ले जाऊ,

अवलंब विना पुन्हा यहा ले आऊ,

विश्वास किया इन वचनो पे,

जगत अनुभव संग्रह मै लेके,

उद्धार तेरा मा मै करके,

त्वरित लौट आऊ कहके,

छोड उसे दूर निकल मै आया….

जान मचले, प्राण मचले, ऐ रे दरिया…….१

 

शुक बंदी या मृग जाल समीप हो जैसे

मै जखड गया कुछ ऐसे,

भू विरह अभी और सहू मै कैसे?

दशदिशा तमोमय जैसे

गुण पुष्प भी ये मै यही सोचकर पाऊ,

के मा को मे महकाऊ,

पर व्यर्थ सभी जो मा के काम ना आये,

उद्धार ना जो उसका कर पाए,

वह आम्रवृक्षवत्सलता जो,

नव कुसुम खीले हे ममता जो,

बहु लाल गुलाब हे खिलता जो,

फुलबाग वही ना फिरसे देखने पाया,

जान मचले, प्राण मचले,ए रे दरिया……२

 

गगन तले इन तारक दल में सारी

मुझको प्यारी तारका भरत भू मेरी

इन महलो से मुझे लगे अति प्यारी

मा की ही झोपडी मेरी

उसके बिना कोई राज्य भी मुझको देगा

उसके वन का वनवास मुझे भायेगा

भूलू उसको ये हो ना कभी पायेगा,

यू उसके बिना तो अब ना जिया जायेगा

तुझको तेरी प्रिय पत्नी जो नदिया

होगी वो जुदा मै कसम हू तुझको लाया,

जान मचले, प्राण मचले, ए रे दरिया……३

 

ये झाक लिये निर्दय हसता है कैसे?

क्यू वचन तोडता एसे

स्वामिनी जो कहलाये तेरी है

वह आंग्लभूमी भयभीत क्यू हो आई है

मेरी मा को अबल समज है फसाया,

मुझको तू जो दुर देश ले आया

पर आंग्लभूमी-भयभीता है

और अबल न मेरी माता है

अब देख अगस्ती आता है

और तुझको फिर समझाता है,

जो तुझको कभी प्राशन था कर लाया…

जान मचले प्राण मचले, ए रे दरिया…..४

 

ले चल मुझको, लौट मातृभूमि पर

जान मचले प्राण मचले, ए रे दरिया…..

भर तुझ्या पंखात बल


भर तुझ्या पंखात बल
अन घे अता फ़्रिरुनी भरारी
लांघुनी सा-या दिशांना
ये अता अपुल्या किनारी
रे तुझाची ध्यास आता, नेत्रज्योती तेवलेली
अन कुण्या वेड्या जीवाला, आस आता लागलेली
हो तुझ्या मर्गात आहे
अडथळ्यांची रांग मोठी
घारी, ससाण्यांची नजर घे
ध्येयावरी अन ठेव दृष्टी
झुंजुनी घे, लढवुनी घे
देह झिजवुन, उजळुनी घे
ये तुझ्या कष्टांस आहे
साथ धृडतेची मिळाली
की तुझाची ध्यास आता, नेत्रज्योती तेवलेली
अन कुण्या वेड्या जीवाला, आस आता लागलेली
हो तुझ्या डोक्यावरी ना
छत्र आशेचे कुठेसे
ऊन रखरख आणि कोठे
दृष्य ही ना सावल्यांचे
ही धृवाची चांदणी ही
वाट भुलवून लोपलेली
हाक या वेड्या जीवाची
फ़क्त रे तू ऐकलेली
की कुण्या वेड्या जीवाला, आस आता लागलेली
रे तुझाची ध्यास आता, नेत्रज्योती तेवलेली
कर्मफ़ल मिळणे न मिळणे
सत्वरी तू मार्ग क्रमणे
दुर्लक्षितावे या जगाचे
भेसुरे रडणे नी हसणे
तुडविणे पंथास आता
आकाश, धरती व्यापलेली
की कुण्या वेड्या जीवाला,
आस आता लागलेली
रे तुझाची ध्यास आता, नेत्रज्योती तेवलेली
सौ सुरुचि

साथी सांज लगी अब होने- सखये आली संध्या वेळा


पसरविले ज्यांना गगनावर

आणि धरेच्या कणाकणावर
त्या किरणांना अस्तांचली बघ
सूर्य लागला करण्या गोळा
सखये आली संध्या वेळा!
खेळत होत्या धूली कणांशी
बिलगत घर अन वृक्ष तळांशी
त्या छायाही प्राची मध्ये
विलीन होती, पसरे काळा!
सखये आली संध्या वेळा!
माती रेती पासून बनले
कुसुम फ़ुलांनी ज्यास सजविले
खेळण्यातले घरकुल सोडून
बालांनी धरीला झोपाळा
सखये आली संध्या वेळा!
मूळ कविता- साथी सांज लगी अब होने- हरिवंश राय बच्चन
अनुवाद- सौ सुरुचि
मूळ कविता

हरिवंश राय बच्चन- लो दिन बीता, लो रात गई अनुवाद- सौ सुरुचि


मूळ कविता- हरिवंश राय बच्चन- लो दिन बीता, लो रात गई
अनुवाद- सौ सुरुचि

गे दिन ढळला, रातही सरली

सूर्य मावळी पश्चिम लाली
श्याम सावळ्या संध्याकाली
गे दिन ढळला, रातही सरली
रोज येतसे तशीच येता
बात नवी का कुठली होता?
तम घन पसरे दाट सावली
प्रात:समयी नवीनतेची
उगाच आशा होती केली
गे दिन ढळला, रातही सरली
चंद्र चंद्रिका उमलू आल्या
नभपटलावर अगणित माला
नेमाने मग निशा दाटली
आस नव्याची संध्याकाली
उगा मना तू होती केली
गे दिन ढळला, रातही सरली
किलबिल पक्षी, कुसूमे साक्षी
प्राचीवरती लालीम नक्षी
नियमित येते अशीच उमलत
पहाट होते तशीच झाली
रात्र लोचनी अधर पापणी
स्वप्न अपुरी झर झर झरली
गे दिन ढळला, रातही सरली
सौ सुरुचि
मूळ कविता

लो दिन बीता, लो रात गई

लो दिन बीता, लो रात गई,
सूरज ढलकर पच्छिम पहुँचा,
डूबा, संध्या आई, छाई,
सौ संध्या-सी वह संध्या थी,
क्यों उठते-उठते सोचा था,
दिन में होगी कुछ बात नई।
लो दिन बीता, लो रात गई।

धीमे-धीमे तारे निकले,
धीरे-धीरे नभ में फैले,
सौ रजनी-सी वह रजनी थी
क्यों संध्या को यह सोचा था,
निशि में होगी कुछ बात नई।
लो दिन बीता, लो रात गई।

चिड़ियाँ चहकीं, कलियाँ महकी,
पूरब से फिर सूरज निकला,
जैसे होती थी सुबह हुई,
क्यों सोते-सोते सोचा था,
होगी प्रातः कुछ बात नई।
लो दिन बीता, लो रात गई,

हरिवंश राय बच्चन यांच्या कवितांचा भावानुवाद


कुण्या करी ही वीणा देऊ?
 
देवांनी होते जिला निर्मिले
झंकारुनी स्वर, तार छेडिले
मानवास या आज कसे मी ह्या वीणेला अता सोववू?
कुण्या करी ही वीणा देऊ?
 
स्वर्ग रमविणे हिने जाणिले
स्वर्ग सुखाचे सूर वाजले
जगात अवघ्या मोद भराया सूर कोणते इथे साठवू?
कुण्या करी ही वीणा देऊ?
 

अभिलाशा ही मनात दाटत

जीवनात हो वीणा झंकृत
ह्रुदय ही हे का निर्ममतेने म्हणत हिला मी अता पेटवू?
कुण्या करी ही वीणा देऊ?
 
मूळ कविता- किस कर मे यह वीणा धर दू?
अनुवाद सौ सुरुचि
 

देवों ने था जिसे बनाया,
देवों ने था जिसे बजाया,
मानव के हाथों में कैसे इसको आज समर्पित कर दूँ?
किस कर में यह वीणा धर दूँ?

इसने स्वर्ग रिझाना सीखा,
स्वर्गिक तान सुनाना सीखा,
जगती को खुश करनेवाले स्वर से कैसे इसको भर दूँ?
किस कर में यह वीणा धर दूँ?

क्यों बाकी अभिलाषा मन में,
झंकृत हो यह फिर जीवन में?
क्यों न हृदय निर्मम हो कहता अंगारे अब धर इस पर दूँ?
किस कर में यह वीणा धर दूँ?

हळूवार


तो नवयूगातला प्राचीन
आजही ज्याची निश्पापता
कायम आहे भयाच्या भयावह
मुठीत….विनाकारण

तो स्वधर्म शिरोधारी
ज्याचे अंत:शारीर गाते
जीवन गीतांचे सूर
परिक्षितापारिक्षितावर

तो प्रवासी..प्रवासाचा
ज्याचे पायास स्पर्षते
धूळ वाटेची,
अन वाट पायांना

तो…उलगडत जातो
त्याला सावकाश
विश्वाच्या जाणीवेच्या
रटाळ ओंगळवाण्या सत्यानंतर

तो जाणतो त्याच्या उंची
खोलीचे मापदंड
आणि प्रार्थितो ईश्वराकडे
त्याचे स्वत:चेच मोजमाप

सांधतो तुटताना, तुटतो
सांधताना कातरवेळा…
एकमेवाद्वितीय अथांगतेचा डोही
प्रश्नराशीला उत्तराएवढाच सरल….

मी समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे…
त्या विश्वनिर्मात्याची निर्मिती
त्या निर्मितीचा तो निर्माता
हळूवार…अगदीच हळूवार